पारंपरिक ज्ञान देशीची संपत्ती : बहेती

पारंपरिक ज्ञान देशीची संपत्ती : बहेती
Published on

चास, ता. ५ : ‘‘गावांकडील पर्यावरणपूरक साहित्य आणि पारंपरिक ज्ञान ही देशाची मोठी संपत्ती आहे. आधुनिक युगात ही संस्कृती टिकवून ती वाढवणे काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन वास्तुविशारद भारत बहेती यांनी केले.
गुंडाळवाडी (ता. खेड) येथे उर्वी पब्लिक ट्रस्ट, बीएनसीए कॉलेज आणि बिबी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उर्वी जागृती’ मेळावा पार पडला. यावेळी जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रदर्शनाचे उद्‌घाटन बहेती यांच्या हस्ते झाले. शिबिराअंतर्गत बीएनसीए कॉलेजच्या ४० विद्यार्थिनींनी गुंडाळवाडी व बुरसेवाडीतील मातीच्या घरांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासाचे प्रदर्शन मांडून ग्रामस्थांना पारंपरिक वास्तूंचे महत्त्व व जतन करण्याचे आवाहन करण्यात आले.
ट्रस्टच्या सचिव अमृता नायडू म्हणाल्या की, हवामानानुकूल आणि शाश्वत वास्तूरचना तयार करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. यावेळी देवश्री वांगे, सायली कुलकर्णी, मिलिंद मोरे, सरपंच संगिता तनपुरे, बाबूराव भारे, सतीश जैद, सुजाता भोर, नितीन सैद व महेंद्र थोरात उपस्थित होते.

04469

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com