जिल्हा टीडीएफच्या अध्यक्षपदी सोमनाथ भंडारे

जिल्हा टीडीएफच्या अध्यक्षपदी सोमनाथ भंडारे
Published on

जेजुरी, ता. ७ : पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीची (टीडीएफ) त्रैवार्षिक नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी सोमनाथ भंडारे यांची तर सचिवपदी तानाजी झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय जैन संघटना हायस्कूल वाघोली येथे पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीची सर्वसाधारण सभा झाली. सभेमध्ये त्रैवार्षिक नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव केरुभाऊ ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष गोरक्षनाथ थोरात, पुणे विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे यांनी काम पाहिले. या सभेसाठी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे मावळते अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा टीडीएफचे मुरलीधर मांजरे, महिला संघाच्या अध्यक्षा स्वाती उपार, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सभासद अनिल साकोरे उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी - कार्याध्यक्ष - किशोर दरेकर, राज्य प्रतिनिधी - मुरलीधर मांजरे (खेड), प्रदीप गाढवे (जुन्नर), रामचंद्र नातू (दौंड), उपाध्यक्ष - सुनील ताकवणे (दौंड), सुनील आदलिंग (इंदापूर), अंकुश कुडपणे, रमेश ढोमसे (जुन्नर), कोषाध्यक्ष - सुनील वीर (भोर), आय व्यय निरीक्षक - मुकुंद भिसे, वार्तापत्र संपादक - राजेंद्र बोधे (हवेली), प्रसिद्धी प्रमुख प्रवक्ता - मीनानाथ पानसरे (जुन्नर), सहकार्यवाह - एकनाथ टोपे(खेड), मनोहर खुणे (मावळ), अविनाश दराडे (आंबेगाव), सहकोशाध्यक्ष - विजय मोहिते (वेल्हे), गणेश मांढरे(शिरूर), सह आय व्यय निरीक्षक - विश्‍वनाथ दामगुडे (भोर), रावसाहेब वाघ (मुळशी), सह वार्तापत्र संपादक - संजय भिंताडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com