ऊसतोड मजूरांना ओळखपत्र काढवे

ऊसतोड मजूरांना ओळखपत्र काढवे
Published on

जुन्नर, ता.३ : ऊसतोड मजुरांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ओळखपत्र काढावे, यांचे आवाहन साखर आयुक्तालय पुणेच्या प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी केले.

निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.२८) येथील श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणेच्या निलिमा गायकवाड तसेच विघ्नहरचे कार्यकारी संचालक भास्कर घुले, सेक्रेटरी अरुण थोरवे,मुख्य शेतकी अधिकारी सचिन पाटील, शेतकी अधिकारी संदीप जाधव, संदीप मोरडे, जयेश ढोमसे, एस.आर.जाधव आदींसह ऊस तोडणी मुकादम, मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सोनल पाटील सांगितले, की ऊसतोड कामगारांसाी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र सेल विधी सेवा प्राधीकरण सुरु केले आहे. तसेच गोपीनाथ मुंढे महामंडळामार्फत ऊस तोडणी मजूरांच्या मुलांकरीता मोफत वसतीगृहे चालविली जात आहेत. मृत्यू पावलेल्या ऊसतोडणी मजूराच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत दिली जाते. त्यासाठी प्रत्येकाजवळ ऊस तोड मजूर कार्ड आवश्यक आहे.

दरम्यान, ऊस तोडणी कंत्राटदार बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. शेतकी अधिकारी संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन तर सचिन पाटील यांनी आभार मानले.

06593

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com