

मोरगाव, ता. १० : मुर्टी (ता. बारामती) येथे ओढा खोलीकरण व सरळीकरणाच्या कामास नुकताच प्रारंभ झाला. यासाठी सकाळ रिलीफ फंड, देसाई ब्रदर्स लिमिटेड व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. खोलीकरणामुळे सुमारे ७० कोटी लिटर अतिरिक्त पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. यामुळे ओढ्यानजिकच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढ होईन शेती सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून ओढा खोलीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बारामती दूध संघाचे अध्यक्ष संजय कोकरे, जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य हनुमंत भापकर, सोमेश्वरचे माजी संचालक लालासाहेब नलावडे, नीरा बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जगदाळे, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष संतोष शिंदे, किरण जगदाळे, प्रमिला लोखंडे, छगन राजपुरे, मंगल खोमणे, सुप्रिया राजपुरे, शिवाजी खोमणे आणि फोरम संस्थेचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, राजपुरे वस्ती - खोमणे वस्ती ओढा खोलीकरण कामासाठी सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्यसभेच्या खासदार व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी खोलीकरण कामासाठी मोफत मशिन उपलब्ध करून दिले आहे.
‘शेतकऱ्यांनीही सहभाग वाढवावा’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिरायती भागात ओढा खोलीकरणासह जलसंधारणाच्या कामास व विविध पाणीपुरवठा योजना प्राधान्य दिले आहे. गावे टंचाई मुक्त करण्यासाठी पवार यांचे अभ्यासपूर्ण प्रयत्न असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गरज पडेल, तिथे शेतकऱ्यांना मदत केली जाईल. मात्र, शेतकऱ्यांनीही या कामात सहभाग वाढवावा असे आव्हान यावेळी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी केले.
02763
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.