

महाळुंगे पडवळ, ता.७ : लौकी (ता.आंबेगाव) येथे मोटारसायकलस्वार नागरिकांवर हल्ला करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (ता.७) पहाटे अडकला आहे. परिसरात असणारा बिबट्यांचा वावर पाहता पुन्हा बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी लौकी ग्रामस्थांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील लौकी ते चांडोली बुद्रुक आणि कळंब ते लौकी या दोन रस्त्यावर राणूबाई मंदिर परिसरात रविवारी (ता.५) रात्री दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाने सेवानिवृत्त कृषी विभागातील अधिकारी वसंत तुळाजी बांगर यांच्या शेतात शेतकऱ्यांच्या मदतीने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात सावज म्हणून शेळी ठेवण्यात आली होती.
शेतकरी विलास मधे यांनी वनविभागाचे वनमजूर जालिंदर थोरात यांना मंगळवारी (ता.७) पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती दिली. वनरक्षक प्रदीप औटी, वनमजूर जालिंदर थोरात, किसन पोखरकर यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. बिबट्यास माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविले आहे. याकामी महात्मा तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष नीलेश थोरात, ओंकार थोरात, सचिन थोरात, विलास मधे, विजय थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली.
02768
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.