

महाळुंगे पडवळ, ता. ४ : चास (ता. आंबेगाव) येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पहिलवानांच्या चीतपट कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. खेड शिवापूर, जुन्नर, शिरूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी परिसरातून येथे पहिलवान आले होते. १२० हून अधिक नामवंत पहिलवानांनी कुस्त्या केल्या.
चास येथे कुस्त्यांच्या मैदानाचे उद्घाटन पहिलवान सदावर्ते बंधू आणि ग्रामस्थांनी केले. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर, उद्योजक सुनील बारवे, उद्योजक किरण बारवे, भाजपचे नेते ताराचंद कराळे, अरविंद वळसे पाटील, माजी सरपंच दौलत बारवे, बाळासाहेब चासकर, हनुमंत मानकर, संतोष चासकर, मधुकर बारवे, मिलिंद बारवे, विक्रम बारवे उपस्थित होते. यावेळी १०० रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंत लावलेल्या कुस्त्या पहिलवानांनी चीतपट करत नागरिकांची वैयक्तिक बक्षीसे प्राप्त केली.
यावेळी अत्यंत चुरशीच्या कुस्त्या पहावयास मिळाल्या. एकूण एक लाख ५१ हजार रोख रक्कम, चांदीची गदा, १८ चषक आणि सन्मानचिन्हे पहिलवानांना देण्यात आली.
तन्वी रोकडे (वडगाव कांदळी) व ऋतिका मुजूमल (खेड शिवापूर) या मुलींमध्ये १२ हजार रुपयांसाठी झालेली कुस्ती लक्षवेधी ठरली. तन्वी रोकडे हिने बाजी मारली. प्रवीण चव्हाण, आदिश जाधव, दीपक गुंजाळ, रोशन चव्हाण, शिवम भोर, आदित्य बांगर आदी नामवंत पहिलवानांच्या कुस्त्या चीतपट झाल्या. पंच म्हणून तानाजी बारवे, संतोष कचर बारवे, प्रवीण भोर, चंद्रकांत रोकडे, दत्ता भोर, मनोज बारवे, संतोष बारवे आदींनी काम पाहिले. आखाड्यांचे संयोजन दत्ता बारवे, दशरथ भोर, एकनाथ भोर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.