

निरगुडसर, ता.१७ : ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या महावितरणच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याततील १४ हजार ९७१ शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली असून ५ हजार ४७३ कृषिपंपासाठी शेतकऱ्यांनी पाच किंवा १० टक्के रक्कम भरलेली आहे.आत्तापर्यंत १ हजार ७६३ सौर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आले असून ३ हजार ६९५ सौरकृषी पंप बसवण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाईट तयार केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
राज्य सरकारच्या या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात मिळते. सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी केवळ दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या वेबसाइटवर नोंदणी करा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनीhttps://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. वेबसाइटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत.
असा लाभला योजनेला प्रतिसाद
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज......१४ हजार ९७१
५ किंवा १० टक्के रक्कम भरलेले शेतकरी......५हजार ४७३
सौर कृषिपंप कार्यान्वित......१ हजार ७६३
काम पूर्णत्वाकडे असलेले सौर कृषी पंप......३ हजार ६९५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.