उरळगाव येथे विद्यार्थ्यांकडून जनजागृती

उरळगाव येथे विद्यार्थ्यांकडून जनजागृती

Published on

रांजणगाव सांडस, ता. १० : उरळगाव (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण विभागाचे न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांचा वेश परिधान करून प्रभात फेरीद्वारे पर्यावरण जनजागृती, स्वच्छतेचे, पाणी बचतीचे, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे संदेश फलक व घोषणा देऊन जनजागृती केली.

विठ्ठल रुक्मिणीसह, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेतील मुले दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन, फुलांनी सजवलेली पालखी त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवण्यात आली होती.

याप्रसंगी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रघुनाथ गिरमकर, अमोल होलगुंडे, मोहन सात्रस, सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र गिरमकर, प्रकाश आफळे, कादीर शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव कुदळे, राणी बांडे, मेजर भानुदास शिंदे, कांचन ओव्हाळ, शुभांगी हरिहर, मुख्याध्यापिका शारदा मिसाळ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक लंगे, गजानन जांभळकर, नाना सात्रस, अभय मुथा आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवून, त्यांना ताणतणावातून मुक्त करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आनंददायी शनिवार उपक्रम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने आम्ही त्याचे स्वागत करून प्रत्येक शनिवारी हा उपक्रम उत्साहात राबविणार आहे.
-शारदा मिसाळ, मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल, उरळगाव (ता.शिरूर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.