

सोमेश्वरनगर, ता. ३ : करंजेपूल (ता. बारामती) येथील मेहबूब बाबालाल शेख असे या खेड्यातील ''रँचो''चे नाव आहे. गेली अडतीस वर्ष करंजेपूल येथे साई इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क्स नावाने व्यवसाय चालवतात. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. कुठेच नोकरी लागेना म्हणून वेल्डिंग शिकले आणि बंधू बिस्मिल्ला शेख यांच्या साथीने व्यवसाय सुरू केला. शेतकऱ्यांची अवजारे बनविताना त्यांनी कौशल्ये पणाला लावले.
शेख हे अभियंता तर सोडा आयटीआयदेखील झालेले नाहीत आणि घरातही परंपरा नाही. केवळ बुध्दीकौशल्यासह कष्टाच्या जोरावर त्यांनी संशोधकांनाही अपूर्वाई वाटेल अशी यंत्रे तयार केली आहेत. विशेषतः ट्रॅक्टरवर चालणाऱ्या कृषिपंपाचे आणि जनरेटरचे जुगाड गाजले. हवेवर चालणारी गाडी चर्चेत आली आणि आता प्लॅस्टिक बाटल्या क्रश करणारे आगळेवेगळे यंत्र बनविले आहे.
धान्य पेरतानाच त्याच अवजारातून युरिया सोडण्याचा जुगाड किंवा सारा काढताना वरंबा तयार करता येईल, असे जुगाड केले. शेड अथवा पोल्ट्रीचे नवे तंत्र आत्मसात केले. ए.सी. पोल्ट्रीही त्यांनी उभारली असून पोल्ट्रीतून खत बाहेर काढण्यासाठी स्वयंचलित यंत्र बनवत आहेत.
विजेच्या भारनियमनाचे चटके बसलेल्या शेतकरी मित्रांनी त्यांना ट्रॅक्टरवर चालणारे कृषिपंप बनव असे आव्हान दिले. बहुधा महाराष्ट्रात ट्रॅक्टरवर माऊंट केलेला पहिला कृषिपंप त्यांनी वीस वर्षांपूर्वी बनविला. ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टवर कृषिपंप फिरेल असे तंत्र केले. मोठे शेतकरी, नदीकडेचे शेतकरी अथवा पाण्याचे टँक बांधणारे कंत्राटदार अशांना आतापर्यंत अडीचशे कृषिपंप बनवून दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी एम-८० या दुचाकीच्या इंजिनला काँप्रेसर जोडला. हवेच्या दाबावर चालणारी छोटी चारचाकी तयार केली होती. पुढे अधिक विकसित करायचे राहून गेले.
आज ते रिव्हर्स व्हेंडिंग मशिन (प्लॅस्टिक श्रेडर) तयार करत आहेत. भंगार गोळा करणाऱ्या व्यवसायिकाला प्लॅस्टिक बाटल्या क्रश करण्यासाठी ते उपयोगात येणार आहे. याआधी त्यांनी तयार केलेल्या पाच मशिन रत्नागिरीच्या नव्या विमानतळावर एका स्वयंसेवी संस्थेमार्फत पाठविले गेले आहे. त्यांनीच बी.ई. मेकॅनिकलपर्यंत शिक्षण दिलेला भाचा सरफराज शेख याची त्यांना यासाठी मदत झाली. आता मुलगा अभियंता सोहिल व समीर यांच्या नव्या तंत्राची मदत होत आहे.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सतत नवा विचार करतो. चार-सहा महिने आदबत राहिलं की नवा शोध लागतो. रोजीरोटी महत्त्वाची असल्यानं शोध लावायला फार वेळ मिळत नाही. तरीपण राज्यात पहिल्यांदा ट्रॅक्टर माऊंटेड कृषिपंप आपण बनविला. सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात पंप दिलेत.
- मेहबूब शेख,
03324
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.