सोमेश्वर’ची साखरनिर्मिती १५ लाखांवर झेप

सोमेश्वर’ची साखरनिर्मिती १५ लाखांवर झेप
Published on

सोमेश्वरनगर, ता. २८ : राज्याचा हंगाम शंभर दिवसांवर आलेला असताना सोमेश्वर साखर कारखान्याने १४२ दिवसांत १२ लाख ९८ हजार टन गाळप केले व १५ लाख ५७ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. राज्यात ‘सोमेश्वर’ने गाळपात सातवे तर साखरनिर्मितीत चौथे स्थान पटकावले आहे. दरम्यान, ‘सोमेश्वर’ने मागील २६ वर्षातला १२.२७ टक्के इतका सर्वोच्च साखर उतारा प्राप्त केला आहे.

ऊसटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा हंगाम फेब्रुवारीत संपला. पण सोमेश्वरचे सततचा उत्तम दर, फेब्रुवारीपासूनच्या तोडीला दिलेले अनुदान यामुळे शेतकऱ्यांनी अन्य कारखान्यांना ऊस न दिल्याने गाळप समाधानकारक झाले. ३५ हजार ५०० एकर ऊस तोडला गेला. शेतकऱ्यांना एकरी ३६ ते ३७ टन उत्पादन मिळाले. यावर्षी तब्बल २६ हार्वेस्टरद्वारे एक लाख ७० हजार टन ऊस तोडला आहे. जेमतेम ५० हजार टन ऊस बाहेर गेला तर ९८ हजार टन गेटकेन आणण्यात यश आले.

कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, कारखान्याची गाळपक्षमता दैनंदिन ७५०० टन असताना दैनंदिन ९१०० टन प्रतिदिन क्षमतेने कारखाना चालला. तोडणी नियोजन, तांत्रिक क्षमता, अचूक व्यवस्थापन यामुळे साखर उतारा ११.९९ टक्के इतका झाला. बी हेवी मोलासेसनिर्मितीमुळे उताऱ्यात ०.२८ टक्के घट झाली होती. त्यानुसार अंतिम उतारा १२.२७ टक्के इतका झाला आहे. यापूर्वीचा १२.३२ टक्क्यांचा विक्रम आहे.

कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले की, उसाची पळवापळवी, आमिषे सुरू असतानाही बाहेरच्या कारखान्यांना ऊस न देता सभासदांनी ‘सोमेश्वर’ प्रती निष्ठा आणि विश्वास प्रकट केला आहे. कारखान्याने ७५०० टन प्रतिदिन क्षमतेनुसार राज्यात प्रथम क्रमांकाचे गाळप केले आहे. सभासदांचा पाठिंबा, दिवंगत नेते अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाची धोरणे, कामगार-अधिकाऱ्यांची आणि वाहतूकदार-तोडकरी यांची साथ या टीमवर्कमुळे यश मिळाले.

हंगामाची वैशिष्ट्ये -
गाळप.........१२,९८,५५९ टन
साखर उतारा.........१२.२७ टक्के
साखरनिर्मिती.........१५,५७,६५० क्विंटल
साखरनिर्यात.........६७ हजार क्विंटल
गाळपक्षमतेचा वापर.........१२२ टक्के
पहिली उचल.........३३०० ते ३५०० रुपये प्रतिटन
हार्वेस्टरची संख्या.........२६

उपपदार्थनिर्मिती
बी हेवी इथेनॉल.........४० लाख लिटर
सी हेवी इथेनॉल.........४० लाख लिटर
आरएस व ईएनए.........४६ लाख लि.
वीजनिर्यात.........७ कोटी ३८ लाख युनिट

जेजुरी-मोरगाव गटाचे सर्वाधिक गाळप
निंबुत - ७४६५३, मुरूम - ८८४५४, होळ - ११६९६८, कोऱ्हाळे - १२८८१९, मोरगाव - १३४०२१, जेऊर-मांडकी - ९४७८१, जेजुरी-२१७९६५, खंडाळा-१०१११४, फलटण-३५५३४, पिंपरे-१२३६५३, करंजे-१२१७९९, खंडाळा- ६९८३


05499

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com