कोंढापुरी, तळेगाव ढमढेरेत आढळले बिबटे मृत

कोंढापुरी, तळेगाव ढमढेरेत आढळले  बिबटे मृत
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. ४ : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी व तळेगाव ढमढेरे येथील उसाच्या शेतात शनिवारी दोन मादी बिबटे मृतावस्थेत आढळले. वनविभागाने दोन्ही बिबट्यांचा ताबा घेऊन शवविच्छेदनानंतर त्यांचे दहन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कोंढापुरी येथील सुभाष गायकवाड आणि तळेगाव ढमढेरे येथील अरुण भुजबळ यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना हे बिबटे मृतावस्थेत सापडले. वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या सूचनेनुसार वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक प्रमोद पाटील आणि वन्यजीव बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद राठोड यांनी दोन्ही मादी बिबट्यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाच्या नियमानुसार त्यांचे दहन करण्यात आल्याची माहिती निळकंठ गव्हाणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com