निगडे येथे कोयत्याचा धाक दाखवून चोरी

निगडे येथे कोयत्याचा धाक दाखवून चोरी
Published on

वेल्हे, ता.७ : निगडे (ता. राजगड) येथे दोन अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवत चोरी केली. ही घटना रविवारी (ता.५) रात्री घडली. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.६) उशिरा गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी राहुल चंद्रकांत कोंढरे (वय ४५, रा. आंबेगाव पठार, ता. हवेली) यांना मारहाण करीत सुमारे पाच लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निगडे येथे सेंट्रींगचे काम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रविवारी रात्री सुमारे ८:५० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून दोन अज्ञातांनी त्यांची भेट घेतली. यानंतर दोघांनी संगनमताने कोयत्याचा धाक दाखवत कोंढरे यांना मारहाण केली व सोन्याचे ऐवज हिसकावून नेला.
या घटनेत आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील १० तोळ्यांचा सोन्याचा गोफ, सहा तोळ्यांची सोन्याची चैन, सुमारे सव्वा तीन तोळ्याची अंगठी, सव्वा तोळ्याची दुसरी अंगठी, तसेच खिशातील पाकीट व रोख रक्कम जबरीने हिसकावून नेली. याशिवाय, फिर्यादींचे मित्र तानाजी श्रवण गायकवाड यांचा मोबाइलही आरोपींनी चोरून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com