Schoolympics 2023 : स्कूलिंपिकच्या तिरंदाजीत अटीतटीच्या लढतीत जान्हवी पवारची समा पाटीलवर मात

अभिनव इंग्लिशच्या युवराजला दोन सुवर्ण
Schoolympics 2023
Schoolympics 2023
Published on

Pune News : स्कूलिंपिकच्या तिरंदाजीत अभिनव इंग्लिश स्कूलच्या युवराज भोसले याने दोन सुवर्णपदकांची लयलूट करीत लक्षवेधी कामगिरी नोंदविली. कोथरूडमधील फोकस आर्चरी अॅकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरु आहे. युवराजने इंडियन बो विभागात ३० आणि ४० मीटर अशा दोन्ही प्रकारांत सुवर्ण मिळविले.

आंबेगाव बुद्रूकच्या श्रीचक्रधरस्वामी माध्यमिक विद्यालयाच्या जान्हवी पवारने अटीतटीच्या लढतीत रिकर्व्ह बो विभागातील ४० मीटर प्रकारात सुवर्णपदक मिळविले. जान्हवी आणि समा पाटील यांनी प्रत्येकी ३१२ गुण मिळविले. त्यानंतर बुल्सआयचा निकष लावण्यात आला. त्यात जान्हवीने तीन बुल्सआयची कामगिरी नोंदविली. समाला एकदाही बुल्सआय नोंदविता आला नाही.

सविस्तर निकाल

वयोगट : १२ ते १४ वर्षे
प्रकार : इंडियन बो २० मीटर
मुले : सुवर्ण ः संस्कार खिलारे (३०१ गुण, गुरुकुल विद्यामंदीर, गोखळी), रौप्य ः अक्षय चौगुले (३००, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल), ब्राँझ ः परिमल देशपांडे (२९३, जी. जी. इंटरनॅशनल, पिंपरी)

मुली : सुवर्ण ः लावण्या वाल्हेकर (३१७, बालशिक्षण इंग्लिश, कोथरूड), रौप्य ः श्रेया तेली (३१४, क्रुट मेमोरियल, वानवडी), ब्राँझ ः समृद्धी सूर्यवंशी (२९९, श्री नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर)

प्रकार ः इंडियन बो ३० मीटर

मुले : सुवर्ण ः प्रभू डोंगरे (३१४, भारती विद्यापीठ इंग्लिश, धनकवडी), रौप्य ः आरुष नाईक (३०७, महेश विद्यालय इंग्लिश, कोथरूड), ब्राँझ ः अक्षय चौगुले (३०५, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक)

मुली : सुवर्ण ः शांभवी काकडे (३१५, अमृता विद्यालयम, निगडी), रौप्य ः समृद्धी सूर्यवंशी (३११, श्री नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर), ब्राँझ ः लावण्या वाल्हेकर (३०३, बालशिक्षण इंग्लिश, कोथरूड)

प्रकार ः रिकर्व्ह बो ३० मीटर

मुले : सुवर्ण ः युवराज भोसले (२९३, अभिनव इंग्लिश, एरंडवणे), रौप्य ः शार्विल रायकर (२८४, डीएसके स्कूल, धायरी), ब्राँझ ः प्रज्वल नाईक (२३०, अभिनव इंग्लिश, एरंडवणे)

मुली : सुवर्ण नीदा सूर्यवंशी (२७२, आर्यन्स वर्ल्ड, वारजे), रौप्य ः आर्या चामले (२४५, एसपीएम पब्लिक स्कूल, टिळक रोड), ब्राँझ ः आर्या पराशर (२३३, एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड)


प्रकार ः इंडियन बो ४० मीटर

मुले : सुवर्ण ः युवराज भोसले (२९२, अभिनव इंग्लिश, एरंडवणे), रौप्य ः कृष्णा आजिनाथ गंभिरे (२८६, सिग्नेट पब्लिक, हडपसर), ब्राँझ ः शार्विल रायकर (२७६, डीएसके स्कूल, धायरी)

मुली : सुवर्ण ः जान्हवी पवार (३१२, श्रीचक्रधरस्वामी माध्यमिक विद्यालय, आंबेगाव बुद्रूक), रौप्य ः समा पाटील (३१२, वॉलनट, फुरसुंगी), ब्राँझ ः सुहाना उपाध्याय (३०९, आर्मी पब्लिक स्कूल ३, घोरपडी)


कंपाउंड बो ५० मीटर

मुले : सुवर्ण ः परिस गांधी (२५८, बालशिक्षण इंग्लिश, कोथरूड)

मुली : सुवर्ण ः राजनंदिनी भोसले (२९४, सुंदराबाई मराठे विद्यालय, खराडी), रौप्य ः रियांशा वाबळे (२७२, बिशप्स को-एड, उंड्री), ब्राँझ ः धारा बीडकर (१७२, डीएव्ही पब्लिक, औंध)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com