

पुणे, ता. १७ : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला पहिल्याच दिवशी गर्दी केली. घर सजावटीच्या अप्रतिम पर्यायायांसह इलेक्ट्रिक वस्तू, नव्या शैलीचे कपडे, लहान मुलांसाठी पारंपारिकसह अत्याधुनिक खेळणी आणि दिवाळीच्या तयारीचे साहित्य अशा विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद नागरिकांनी लुटला.
‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला गुरुवारपासून सुरूवात झाली असून या प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉल्स आहेत. प्रदर्शनात कुटुंबासाठी आवश्यक विविध उत्पादने खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. फॅशनेबल दागदागिने, सौंदर्यप्रसाधने, भरजरीसह हातमागाच्या साड्या, पारंपारिक कपडे खरेदी करण्यासाठी महिलांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी गर्दी केली. जादुई पुस्तके आणि खेळ यांचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले असून येथे लहान मुले विविध खेळणी खरेदी करण्यात रममाण झाल्याचे दिसून आले.
घरातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने अबालवृद्ध आवर्जून खरेदीसाठी प्रदर्शनाला भेट देत आहेत. हे प्रदर्शन येत्या सोमवार (ता. २१) पर्यंत खुले राहणार आहे.
वैशिष्ट्ये....
- गॅस स्टोव्ह, स्वयंपाक घरातील चिमण्या, ग्रिलर्स, किचनवेअर्स
- घर सजावटीसाठी कृत्रिम फुले, हस्तकला, बेडशिट्स, कुशन कव्हर्स
- स्पेस सेव्हिंग फर्निचर, प्राचीन फर्निचर तसेच रजई, गालिचे, सोफे
खाद्यपदार्थांचा आस्वाद
या प्रदर्शनातील कॅफेटेरियामध्ये विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने नागरिक खरेदीसोबतच चवदार खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद घेत असल्याचे दिसून आले. याशिवाय विविध मसाले, बेकरी उत्पादने, दूध आणि तूप असे विविध खाद्यपदार्थ येथे विक्रीस उपलब्ध आहेत.
विविध वस्तूंचे स्टॉल्स
रांगोळी, रांगोळीचे रंग आणि साहित्य, दिवाळीसाठी आकर्षक भेटवस्तू आणि सजावट साहित्य, आकाशकंदील, दीपमाळा अशा वस्तूंचे विविध स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. दिवाळीची पूर्व तयारी करण्यासाठी नागरिकांनी विशेषकरून प्रदर्शनाला भेट देऊन खरेदी करण्यास पसंती दिली.
‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’
कधीपर्यंत : २१ ऑक्टोबरपर्यंत
केव्हा : सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत
कुठे : पंडित फार्म्स्, डीपी रस्ता, कर्वेनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.