

पुणे, ता. १० : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून सरबत व मॉकटेलला मागणी असते. नैसर्गिक फळांपासून व आर्टिफिशियल पद्धतीने विक्रीयोग्य सरबत व विविध प्रकारची नावीन्यपूर्ण मॉकटेल तयार करण्यास शिकवणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १२) आयोजिली आहे. यामध्ये कोकम, आवळा, पाचक, पुदिना, बेलफळ, पेरू, लेमन, कैरी, चिंच, संत्री, लीची, आंबा, गुलाब, अननस, काला खट्टा, मध, ब्ल्यूबेरी इत्यादी सरबते तसेच कोकम आगळ, टिकाऊ कैरी पन्हे, जीरा सिरप ही उत्पादने शिकवली जाणार आहेत. यामध्ये नैसर्गिक फळांपासून वर्षभर टिकणारे सरबत व विक्रीयोग्य सिंथेटिक पदार्थ वापरलेले सरबताचा समावेश आहे. यासोबतच मॉकटेलचे नावीन्यपूर्ण प्रकार व मॉकटेल्स बनवण्याच्या नावीन्यपूर्ण कृती कार्यशाळेत शिकविल्या जातील. या व्यवसायाचे पॅकिंग, कॉस्टिंग, प्रीझर्वेशन, सरबत टिकविण्याची पद्धत, मार्केट आदी बाबींची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सलून, ब्युटी व्यावसायिकांसाठी वेबिनार
सलून आणि ब्युटी व्यावसायिक व कर्मचाऱ्यांसाठी हेअर पॅच व हेअर एक्स्टेंशन ॲप्लिकेशन तंत्र ही एक दिवसीय कार्यशाळा २१ एप्रिलला आयोजिली आहे. यात केसांचे पॅच आणि एक्स्टेंशन्स लावण्याचे विविध प्रकार तज्ज्ञांकडून समजून घेण्यापासून ते नैसर्गिक लुकचे तंत्र, केसांची सजावट, ॲप्लिकेशन वापरण्याच्या सुरक्षित पद्धती आणि आफ्टरकेअर टिप्स प्रात्यक्षिकासह शिकवल्या जाणार आहेत. यासंदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार १४ एप्रिलला आयोजिला आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
प्राध्यापक कौशल्य प्रशिक्षण
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रभावी अध्यापन या विषयावर एक विशेष प्राध्यापक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देशभरातील महाविद्यालयीन शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुधारणा घडवून आणणे, अध्यापन पद्धतीत नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून बदल घडवून आणणे हे असणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी, कृषी, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन महाविद्यालये या क्षेत्रातील प्राध्यापक, प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापकांसाठी उपयुक्त प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी व शिक्षण क्षेत्राच्या भविष्याशी जुळवून घेण्यास तयार होण्यासाठी हे प्रशिक्षण शिक्षण क्षेत्रातील सर्वांनाच उपयुक्त आहे. हे एक दिवसीय परस्परसंवादी आणि प्रात्यक्षिकासह होणारे प्रशिक्षण आहे जे शिक्षक, प्राध्यापकांना शिक्षणाच्या बदलत्या दृष्टिकोनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने, तंत्रे आणि ज्ञान प्रदान करेल.
संपर्क : ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.