पुण्यात कमाल तापमानात किंचित घट

पुण्यात कमाल तापमानात किंचित घट
Published on

पुणे, ता. १० : उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. मागील पाच दिवसांपासून चाळिशीच्या घरात स्थिरावलेले कमाल तापमान आता हळूहळू उतरत असून गुरुवारी (ता. १०) कमाल तापमानात किंचित घट नोंदवली गेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत कमाल तापमानात आणखी किंचित घट होण्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या पाच दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. तर उपनगर परिसरामध्ये ४२ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली होती. मात्र, गुरुवारी कमाल तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे शहरात ३९ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे, तर किमान तापमानातही किंचित घट झाली आहे. किमान तापमान २४.९ अंश सेल्सिअस नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. ११) कमाल तापमानात बदल होणार नसून कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर शनिवारी (ता. १२) कमाल तापमानात किंचित घट होणार असून, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदविले जाण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com