नवीन योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठयाची नगराध्यक्षांनी केली पाहणी

नवीन योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठयाची नगराध्यक्षांनी केली पाहणी
Published on
(पान ४ ला मेन) SKD26B04102 शिंदखेडा : लक्ष्मीनारायण कॉलनीतील पाणीपुरवठा योजनेची पाहणी करताना नगराध्यक्षा कलावती माळी व नगरसेवक. ----------- शिंदखेड्यात नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी नगराध्यक्षा कलावती माळींकडून आंबेडकर नगर, लक्ष्मीनारायण कॉलनीची पाहणी सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. १६ : येथील प्रभाग क्रमांक तीन मधील आंबेडकर नगर येथे नवीन पाणीपुरवठा योजनेची पाहणी लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी व नगरसेवकांनी केली. या वेळी या पाणीपुरवठा योजनेची चाचणी घेण्यात आली. शहराच्या काही भागांत जाऊन या योजनेची पाहणी करत संबधित ठेकेदाराकडून फेज टू च्या योजनेची माहिती घेतली व योग्य त्या सूचना केल्या. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या पाणी योजनेचे काम पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांमध्ये होत आहे. शहरातील शिवाजी चौकाचा काही भाग, लक्ष्मीनारायण कॉलनी, आबेडकर नगर या भागामध्ये या नवीन पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून, नगराध्यक्षा माळी यांनी आंबेडकर नगर येथे भेट देऊन या भागात नवीन पाणी योजनेची पाहणी केली. याशिवाय लक्ष्मीनारायण कॉलनी होत असलेल्या योजनेच्या व्हॉलच्या कामाची पाहणी देखील त्यांनी केली. या वेळी नगरसेविका पुष्पाताई सोनवणे, रुजूबाई माळी, कमलबाई पाटोळे, अर्जुन भिल, प्रा. दीपक माळी, पं. स.चे माजी सदस्य सुभाष माळी, अरुण देसले, राहुल पाटोळे, राहुल पाटील आदी उपस्थित होते. --------- जल कुंभाजवळील व्हॉलची दुरुस्ती विरदेल रोडवरील काकाजी पेट्रोल पंपामागील जलकुंभाच्या जवळ योग्य प्रकारे व्हॉल न बसवल्याने या भागात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या समस्या जाणवत होत्या. या जल कुंभाजवळील व्हॉल योग्यरीत्या बसवण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष यांनी दिल्या होत्या त्याची दुरुस्ती झाल्याने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com