

खडकवासला, ता. २७ : वारजे माळवाडीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले.
वारजे माळवाडी गणपती माथा येथील शिवार प्रतिष्ठानची शाखा, पाणपोई व वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. तसेच, शिवजयंती निमित्ताने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. यात स्पर्धकांनी मराठी व हिंदी गाण्यांसह महापुरुषांवरील गाण्यांवर नृत्य सादर केले. अनबीटेबल डान्स अँड फिटनेस स्टुडिओला पारितोषिक मिळाले.
या वेळी दिलीप बराटे, सायली वांजळे, लक्ष्मी दुधाणे, दीपाली धुमाळ, शुक्राचार्य वांजळे, अनिता इंगळे, उद्योजक शरद बराटे, अतुल दांगट, शिवार प्रतिष्ठानचे संस्थापक नवनाथ चव्हाण उपस्थित होते.
शिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन लहू मोहोळ, उपाध्यक्ष स्वप्नील दिघे, समीर कुडले, सागर सोनावणे, अक्षय शेलार, शुभम अबनावे, प्रदिप वांजळे, अनिल ठाकरे, नवनाथ सोनार, अजय धनवडे, साहिल मांजरे, अनिल वांजळे, बुवा अबनावे, स्वानंद यादव यांनी सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.