महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सुळे

महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या 
विरोधात लढाई : सुळे
Published on: 

खडकवासला, ता. ६ : ‘‘माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांचे आयुष्य उद्‍ध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. दिल्लीतील महाराष्ट्रद्वेशी असणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे. मराठी अस्मितेचा हा प्रश्न आहे.’’, अशी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयं सहाय्यता बचत गट संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष-घर फोडले. शरद पवारांचा पक्ष फोडला. नितीन गडकरींचे अधिकार कमी केले. देवेंद्र फडणवीस यांना दहा गुणांवरून अडीच गुणांवर आणले. अशाप्रकारे मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढाई सुरु आहे’’, असे सुळे यांनी सांगितले.
सुळे म्हणाल्या, ‘‘वरील चारही घटनेत जनतेचे नुकसान झाले नाही. परंतु पुणे जिल्ह्यात येणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. येथे दीड लाख युवकांना नोकऱ्या मिळणार होत्या. मुंबईतील हिऱ्यांचा व्यवसाय शरद पवार यांनी टिकवला. यामुळे तीन लाख नोकऱ्या तयार झाल्या होत्या. आता हा व्यवसाय देखील दुसऱ्या राज्यात जात आहे. याला कोण जबाबदार आहे?’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com