

उंड्री, ता. ५ : वडाचीवाडीमध्ये मागील दीड महिन्यापासून वारंवार वीज खंडित होत असल्याने रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. महावितरणने तातडीने या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
येथे दररोज सकाळी सात वाजता खंडित होणारा वीजपुरवठा दुपारी एकनंतर सुरळीत होत आहे. यामुळे महावितरणने नागरिकांना पूर्वसूचना न देता अघोषित भारनियमन सुरू केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळी वीज नसल्याने गृहिणींची मोठी ओढाताण होत असून, मुलांचे डबे व घरगुती कामे करताना अडचणी येत आहेत. मोबाईल चार्जिंगअभावी बंद राहत असल्याने संपर्क साधणेही कठीण झाले आहे. नागरिकांना दिवसाची सुरुवात अंधारात करावी लागत असल्याचे चित्र सध्या वडाचीवाडीमध्ये दिसत आहे.
विजेच्या कमी-जास्त दाबामुळे विद्युत खांबांवर वारंवार शॉर्टसर्किट होत असून, ते रोखण्यात महावितरणला अपयश येत आहे. महावितरणकडून केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, मात्र ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. प्रशासनाने योग्य क्षमतेच्या वाहिन्या आणि आधुनिक उपकरणे वापरून हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
येथील खडीमशीनसाठी महावितरणकडून अखंडित सेवा दिली जात आहे. आम्ही वीजबिल वेळेवर भरून देखील आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- युवराज धनवडे, नागरिक, वडाचीवाडी
येथील समस्येची पाहणी करून योग्य उपाययोजना करण्याचे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते. कामासाठी का वेळ लागला आहे, हे तपासून त्वरित काम करण्यास सांगत आहे.
- सोमनाथ माने, अधीक्षक अभियंता, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.