पुणे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही शून्य कोरोना मृत्यूची नोंद

corona
coronasakal

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी (ता.२२) कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे पुणे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात एकूण ३८० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील ९१ रुग्ण आहेत. दरम्यान, शहरात मागील सलग दोन दिवस शून्य मृत्यू नोंदले गेल्यानंतर शुक्रवारी मात्र दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

याउलट दिवसांत ५०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्वाधिक २६७ जण आहेत.पुणे शहरातील ११३, पिंपरी चिंचवडमधील ९३, नगरपालिका हद्दीतील ३० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona
Pune : नवले पूलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यु

दिवसातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ९१ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ७६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १९०, नगरपालिका हद्दीत २० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ३ हजार ९४२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी १ हजार ८४६ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. उर्वरित २ हजार ९५ रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. शहरातील दोन आणि पिंपरी चिंचवडमधील एक अशा एकूण तीन रुग्णांचा दिवसात मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात मिळून आजही एकही मृत्यू झाला नाही. हे तीनही क्षेत्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येतात. त्यामुळे दिवसात आज पहिल्यांदाच ग्रामीण भागात शून्य कोरोना मृत्यू नोंदले गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com