सुपरइंटेलिजंट AI लवकरच येणार; तयारीसाठी माणसाकडे एकच वर्ष! मेटाचे मुख्य AI अधिकारी अलेक्झांडर वांग यांचा मोठा इशारा...

कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ ईमेल लिहिण्यापुरती मर्यादित नसून अलेक्झांडर वांग यांनी याविषयी 'सुपरइंटेलिजन्स' जवळ आल्याचा इशारा देत पुढील एक वर्ष मानवी भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे म्हटले आहे...
Superintelligence AI Warning Alexandr Wang's Call

Superintelligence AI Warning: Alexandr Wang's Call

esakal 

Updated on: 

Superintelligence AI Warning: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात वेगाने घडामोडी घडत असून, तंत्रज्ञान आता अत्यंत प्रगत टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे. मेटाचे (Meta) मुख्य AI अधिकारी अलेक्झांडर वांग यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर 'सुपरइंटेलिजन्स इज अरायव्हिंग' या शीर्षकाखाली सविस्तर पोस्ट लिहून उद्योगविश्व आणि सर्वसामान्यांना सावध केले आहे. या पोस्टला अवघ्या काही वेळात २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. पुढील एका वर्षात मानवजात कशी पावले उचलते, यावर भविष्यातील जग कसे असेल हे ठरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...