

What is Earth Aphelion
sakal
What Happens When Earth Is Farthest from the Sun: पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा पूर्णपणे गोल नसून ती लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्य यांतील अंतर वर्षभरात कमी-अधिक होत असते. साधारणपणे ३ जानेवारीच्या सुमारास हे अंतर सर्वांत कमी असते. या स्थितीला उपसूर्य (पेरिहेलियन) असे म्हणतात. त्यानंतर हे अंतर वाढत जाऊन जुलैच्या सुरुवातीला सर्वाधिक होते, या स्थितीला अपसूर्य (अपहेलियन) म्हणतात.