Millennials; तुमचं पहिलं प्रेम पुन्हा येणार! ऑर्कुटच्या संस्थापकांनी सुरू केली पुनरागमनाची मोहीम; लाखो लोकांचा पाठिंबा

ORKUT COMEBACK NEWS AND LATEST UPDATE 2026: ऑर्कुटचे संस्थापक ब्युयुक्कोक्टेन यांनी प्लॅटफॉर्मच्या पुनरागमनाची मोहीम सुरू केली असून, ११८ देशांतील २.६५ लाख लोकांनी पाठिंबा दिला आहे.
Orkut Comeback

Orkut Comeback

sakal

Updated on: 

एकेकाळी जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेलं ऑर्कुट हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ऑर्कुटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ऑर्कुट ब्युयुक्कोक्टेन यांनी अलीकडेच X आणि LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ऑर्कुट पुन्हा सुरू करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवरील ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली आहे.

इच्छुक लोक orkut.com या वेबसाइटला भेट देऊन या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. ही बातमी लिहिली जात असताना, वेबसाइटवरील माहितीनुसार, ११८ देशांतील सुमारे २.६५ लाख लोकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला होता. या याचिकेच्या माध्यमातून लोकांना अशा नव्या सोशल नेटवर्कमध्ये रस असल्याचं दाखवता येईल, जिथे खऱ्या व्यक्तींशी संवाद साधणे, प्रत्यक्ष नाती निर्माण करणे आणि आपलेपणाची भावना जपणे यांना महत्त्व दिलं जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com