

how to earn money on WhatsApp with the new Paid Channels feature
esakal
Whatsapp Update 2026 : तुम्ही रोज व्हॉट्सॲप वापरता? मग तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. आता याच ॲपमध्ये युट्यूबप्रमाणे पैसे कमवण्याची संधी येत आहे. व्हॉट्सॲप कंपनी पेड चॅनेल सबस्क्रिप्शन फीचर (WhatsApp Paid Channels subscription feature)आणत आहे. यामुळे क्रिएटर्स आपल्या चॅनेलवर विशेष आणि एक्सक्लुसिव्ह कंटेंटसाठी शुल्क आकारू शकतील. जे लोक पैसे देतील त्यांना प्रीमियम अपडेट्स मिळतील तर बाकी सर्वजण मोफत कंटेंट पाहू शकतील.