

A rare Gangetic dolphin surfaces in the waters of the Ganga during a dolphin safari near Varanasi.
Sakal
गंगेच्या स्वच्छ आणि खोल पाण्यात मुक्तपणे वावरणाऱ्या दुर्मिळ गंगेटिक डॉल्फिन्सचा थरारक अनुभव घेण्यासाठी वाराणसीतील ढकवा आणि कैथी या गावांकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. शांत नदी, पारंपरिक चप्पूच्या बोटी आणि अगदी जवळून दिसणाऱ्या डॉल्फिन्स यामुळे या भागात हळूहळू एक वेगळे पर्यटन केंद्र विकसित होत आहे.
वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (WII) आकडेवारीनुसार, कानपूर बॅरेज ते चुनार या गंगा नदीच्या पट्ट्यात देशातील सर्वाधिक डॉल्फिन्स आढळतात. त्यामुळे वाराणसी परिसरातील डॉल्फिन सफारीला पर्यावरणपूरक पर्यटनाचा नवा आयाम मिळाला आहे.