

Rohini Gurjar’s inspiring journey from personal hardships and family tragedies to securing second rank in the RAS examination
esakal
आयुष्यात आलेल्या संकटांसमोर खचून न जाता ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न केले, तर कठीण परिस्थितीतही यश मिळवता येते, हे राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील नरेली गावातील रोहिणी गुर्जर यांनी दाखवून दिले आहे. पतीचे निधन, समाजाकडून झालेले टोमणे, सासूचे निधन, दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू आणि त्यानंतर झालेला रस्ते अपघात अशा अनेक संकटांना सामोरे जात रोहिणी यांनी राजस्थान लोकसेवा आयोगाच्या (RPSC) RAS परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले.