

Contractor associations in Amravati protest over alleged pending payments following the death of contractor Sunil Waghadre.
esakal
अमरावती, : वरुड तालुक्याच्या जरुड येथील एका शासकीय कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कंत्राटदार संघटनांनी दुखवटा व्यक्त केला. अनेकांनी वरुड तहसील कार्यालयावर धडक देऊन रोषही व्यक्त केला.
गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सुनील वागद्रे (वय ४३, रा. जरुड), असे आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. वागद्रे हे स्वत: कंत्राटदार असून, त्यांनी वरुड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची कामे केली. ही कामे एक ते दीड वर्षांपूर्वी केल्या गेली असताना अद्यापही त्यांचे कोट्यवधींचे देयक त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अदा करण्यात आलेले नाही. थकीत देयकांसाठी त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य शासनाकडे वारंवार विनंती अर्ज करून थकीत देयक मिळावे, अशी मागणी केली होती.