

Wardha
esakal
वर्धा: दहेगाव स्टेशन शिवार परिसरात बेकायदेशीर इंधन साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर सावंगी पोलिसांनी कारवाई केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मदतीने घातलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल २ लाख ८५ हजार ७५९ रुपये किमतीचे २ हजार ७३० लिटर डिझेल आणि पेट्रोल जप्त केले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.