Chandrapur News: बंद घर फोडून २६.९० लाखांचे दागिने लंपास

Warora House Theft : लग्नासाठी मुंबईला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या नागपूरमधील दोघांना वरोरा पोलिसांनी अटक केली. ३०.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
Warora police arrested two accused in a house burglary case and seized property worth ₹30.35 lakh

Warora police arrested two accused in a house burglary case and seized property worth ₹30.35 lakh

esakal

Updated on: 

वरोरा : लग्नासाठी मुंबईला गेलेल्या कुटुंबीयांचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना वरोरा पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी आढळलेल्या पावलांच्या ठशांवरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींपर्यंत धागेदोरे जोडले. त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह एकूण ३० लाख ३५ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...