मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशीही सुरू असून, आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतरही जरांगे यांनी उपोषण मागे घेतलेले नाही. त्यामुळे आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील तणाव कायम असल्याचे चित्र आहे. छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हणाले? बघा हा व्हिडीओ..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.