Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाचे मुख्य केंद्र ठरलेल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलक ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे समर्थकांकडून आपल्याला सातत्याने फोन करून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगत त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून अधिकृत तक्रार नोंदवली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सुरुवातीपासून सक्रिय राहिलेल्या ललिता तारख यांच्या या पावलामुळे आंदोलकांच्या अंतर्गत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या तक्रारीमुळे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलनातील अंतर्गत वाद, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आणि आता पोलिसांपर्यंत पोहोचलेले हे प्रकरण मराठा आरक्षणाच्या पुढील रणनीतीवर काय परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.