मेसेज फॉरवर्ड करण्याच्या मर्यादेबाबत व्हॉट्स ऍपकडून महिन्यापूर्वी एक अपडेट जारी करण्यात आले आणि त्यानंतर लागलीच याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. म्हणजे व्हॉट्स ऍपने झटपट आणि अतिशय नियोजनपूर्वक ही उपाययोजना अमलात आणली, त्यामुळे कोरोनाबाबत मेसेज फॉरवर्ड करण्याचे प्रमाण जितक्या वेगाने वाढले होते, तितक्याच वेगाने ते खालीही आले.असे असलेतरी युजर्सकडून अन्य पर्यायांचाही वापर केला गेला, जसे मेसेज हे कॉपी करून पेस्ट करणे, व्हिडिओ डाउनलोड करून पुन्हा शेअर करणे, यावर व्हॉट्स ऍपला काही करता आले नाही; मात्र या पर्यायांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण हे खूपच अत्यल्प असल्याने त्याचे परिणाम जाणवले नाहीत.खरेतर व्हॉट्स ऍपसह सोशल मीडियावर एखादी माहिती इतक्या वेगाने पसरते की, ती रोखणे केवळ अशक्य असते. मात्र, व्हॉट्स ऍप, फेसबुकसह सोशल मीडियावरून वाऱ्याचे वेगाने पसरणारे मेसेज पसरणे खूपच कमी झाले असल्याचे दिसत आहे, हे व्हॉट्स ऍपने केलेल्या उपाययोजनेचे हे यश म्हणावे लागेल.