ब्लॉग

सचिन चराटी 
corona virus argument on social media
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. एका व्हॉट्‌सऍप ग्रुपवर "तबलिगी'वरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. कालांतराने एका समाजघटकावर थेट आरोप सुरू झाले. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती झाली; मात्र काही जाणत्या लोकांनी समजूतदारपणाची आठवण करून देत वातावरण शांत केले, तर काही लोकांनी आपण यात पडायला नको म्हणून सरळ ग्रुप सोडून टाकला.  समाजमाध्यमांत अशा गोष्टी सुरू असतानाच इकडे अनेक गावांत बाहेरून येणाऱ्यांना... आणखी वाचा
शीतल पटवर्धन
Dear Corona
प्रिय कोरोना, दचकलास ना प्रिय म्हणाले म्हणून? गेले दोन महिने तू ठाण मांडून बसलायस बघ. सर्वांच्या आयुष्यात आलास तोच मुळात हलकल्लोळ माजवत. कुण्णा-कुण्णाला सोडलं नाहीस. आपपरभाव नाही, उच्च-नीच नाही, देश-परदेश नाही, गरीब-श्रीमंत नाही. तुझ्यापुढे सर्व सीमा गळून पडल्या. मला माहित नाही तू कुठून आलास! तू मानवनिर्मित आहेस की निसर्गातून उद्भवला आहेस. पण असं तरी कसं म्हणू? शेवटी मानव देखील विलीनच व्हायचाय. अर्थात विलीन होतं... आणखी वाचा
संदीप प्रभाकर कुलकर्णी
EKAANTA Article By Sandeep Prabhakar Kulkarni
तसा तर माणूस येतोही एकटाच आणि जातोही एकटाच. पण जीवनाच्या या प्रवासात सखे-सोबती जमा करण्याचा त्याचा हट्ट काही जात नाही आणि अनेक नातेसंबंधांच्या जंजाळात तो स्वतःला अडकवून घेतो. ‘अडकवून घेतो’ म्हटल्यापेक्षा अडकतो म्हणणे ठीक राहील. गेल्या काही दिवसांत क्वारंटाइन हा यापूर्वी कधीही न ऐकलेला आणि अवघड शब्द आता सर्वज्ञात झाला आहे. एकांतवासाच्या जवळ जाणारा हा शब्द.  एकांत... खरेच या शब्दातच एक समाधान दडलेले असल्याचे... आणखी वाचा
आशुतोष गांगरस, लागोस (नायजेरिया) 
 Nigeria ... Everything is in God's hand : Experiences across the seas
नायजेरिया...आफ्रिकेतील या देश सतत यादवीने ग्रासलेला. ओघानेच गरिबीने पिळून निघालेला. कोरोनासारखी आपत्तीला फुलायला इथे मोठा वाव. टाळेबंदीची चैन इथे न परवडणारी. मग सरकारने शेवटी ती उठवून टाकली. इथे शासकीय आकडेवारी पाहता कोरोनाची भयावहता फार नाही मात्र एकूण इथली वैद्यकीय व्यवस्था पाहिली तर मात्र सारे काही राम भरोसेच !  भारताप्रमाणेच इथे 23 मार्चपासून टाळेबंदी सुरू झाली. महिनाभर चालली पण लोक रस्त्यावर यायला... आणखी वाचा
जयसिंग कुंभार
Corona should stay here forever!
माझं गाव मिरज तालुक्‍यातलं सिद्धेवाडी. 2009 पासून मी इथल्या मसारा क्‍लिनिक अँड अत्तास्मी डायग्नोस्टिक सर्व्हिसेस या हॉस्पिटलमध्ये एमआरआय वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतोय. आता भारतात यायचं आहे, मात्र इथल्या टाळेबंदीमुळे मी इथे अडकून पडलोय. मात्र सध्याच्या कोरोना आपत्तीत या देशाचं झालेलं दर्शन अभूतपूर्व असंच. इथे युद्धजन्य परिस्थिती नेहमीच. ही कृपा अमेरिकेच्या राजकीय हस्तक्षेपाची. पेट्रोलमुळे या देशाला जन्मजात... आणखी वाचा
अमरसिंह घोरपडे
corona effects on farmer blog amarsih ghorpade
कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले; परंतु एक व्यवसाय नेमाने सुरू राहिला तो म्हणजे शेती. या कोरोनामध्ये शेतकरी थांबला नाही. त्याने शेतातील कामे सुरूच ठेवली. शिरोळ तालुका हा भाजीपाल्यांमध्ये आघाडीवर. गेल्या वर्षभरात पाणीटंचाई, महापूर, कोरोना यांसारख्या कारणांनी भाजीपाल्यांची शेती तोट्यात आली; परंतु शिरोळ तालुक्‍यातील शेतकरी डगमगला नाही. त्याने पुन्हा भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. हाताच्या बोटावर मोजता... आणखी वाचा
डॉ. रूपाली श्याम सरकटे, मंठा (जि. जालना)
Article by Dr. Rupali Sarkate On Corona Ward
सलग ड्युटी करून थकले होते. अंथरुणात पडल्या पडल्या कधी झोप लागली कळलंच नाही. अचानक रात्री साडेबारा वाजता फोन खणखणला. रात्रीच्या अंधारात डोळे किलकिले करून नंबर पाहिला. फोन हॉस्पिटलमधून होता. डॉक्टरी पेशात हा प्रकार तसा काही नवीन नव्हता. चार-दोन दिवसाला रात्री-बेरात्री कधी कधी तर पहाटे-पहाटेच असे फोन येतात. पण, डॉक्टरीधर्म पाळायचा असल्याने सुखाची झोप सोडून ते रिसिव्ह करावेच लागतात. जर आपण फोन रिसिव्ह केला नाही तर कधी... आणखी वाचा
धीरज वाटेकर
Bio Diversity Day Special Dheeraj Vatekar Article On Shimple
सायंकाळचे सात वाजून गेलेले. ठिकाण कोकणातल्या खेड तालुक्‍यातील सोनगाव भोईवाडी धक्का (बंदर). गेल्या 12/15 वर्षांत खाडी किनाऱ्यावरच्या लोकांच्या हाताला फारशी न लागलेली शिवलं (तिसऱ्या / शिंपले) तुलनेने मोठ्या प्रमाणावर मिळू लागलेली. रामशेठच्या (रेडीज) दुचाकीवर पुढे अत्यावश्‍यक सेवा' असं ठळक शब्दात लिहिलेला कागद चिकटवलेला.  पेढे - धामणदेवी - सोनगावच्या सीमा' खरंतर समजून न याव्यात इतक्‍या एकमेकांत मिसळलेल्या. पण... आणखी वाचा
मेघना जाधव (सातारा)
Indian Farmer
प्रिय,  एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला आणि मी तुझ्याशी जोडले गेले. तुझ्यासोबत खेळण्यात माझं बालपण गेलं. मग आपलं नात घट्ट होत गेलं. हळूहळू समजत होते मी तुला... तू खूप काही केलंस माझ्यासाठी. माझ्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद पिकवलास. आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरवलंस आणि बांधून ठेवलंस आमच्या घराला सुखाच्या धाग्यांमध्ये...  काळ भराभर निघून गेला आणि मी शिक्षणासाठी घरटं सोडलं... तेव्हा खूप आठवण यायची... आणखी वाचा
डॉ. प्रमोद फरांदे
Alkaline soils due to overuse of chemical fertilizers blog pramod farande
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी राज्य सरकारतर्फे खरीप हंगामाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. कृषी विभागाची राज्यपातळीपासून ते जिल्हा, तालुका पातळीपर्यंत तयारीची लगीनघाई सुरू आहे. राज्यातील कृषी विभाग कामाला लागला. जादा दराने बियाणे, खत विक्री, लिंकिंग करणाऱ्या दुकानांवर कृषी विभागाचे छापासत्र जोमात आहे. ही झाली प्रशासकीय तयारी. दुसरीकडे, शेतकरी राजानेही कोरोनामुळे बसलेला फटका विसरून... आणखी वाचा
विजय नाईक
Slum
कोरोनाच्या दिवसात हात वारंवार साबणाने धुण्याव्यतिरिक्त पाळावयाचा एक महत्वाचा नियम म्हणजे "सामाजिक विलगीकरण (सोशल डिस्टन्सिग)" होय. हे आव्हान अंमलात आणणे सोपे नाही. गेले महिनाभर लाखो मजूरांची जी "घरवापसी" चालू आहे, त्यात विलगीकरणाला धाब्यावर बसवून बिनधास्तपणे हजारो लोक रेल्वे स्टेशन्स, बस थांबे येथे तुफान गर्दी करीत आहेत. गावांकडे जाताना पायपीट करणारे कामगार, मजूर ट्रक्सह अथवा अन्य वाहनात स्वतःला कोंबड्यांसारखे... आणखी वाचा
साक्षी साळुंखे (सातारा)
Caring Thought For Daughter
लुटुलुटु रांगत-रांगत जेव्हा तू घरातून फिरायचीस, तुझे ते बोबडे बोल ऐकून सगळा शीण माझा निघून जायचा. कशी निघून गेली इतकी वर्षे कळालंच नाही. मलाही अन्‌ तुलाही... पण, फार बदल होत गेला का गं तुझ्यात? काय वाटतं तुला? नाही म्हणजे आधी जो बाबा तुला कोणीतरी खूप चांगला हिरो वाटायचा; अगदी त्याच्याशिवाय तुझं पान हलायचं नाही. पण आता तुझ्या मनात कोणती धाकधूक वाटतेय? नाही कदाचित माझेच गैरसमज असतील बाळा, हे सगळे..!  नाही... आणखी वाचा
- डॉ. अरविंद बुरुंगले, माजी सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा.
Appsaheb Patil
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हाडाची पुडं व रक्ताचे पाणी करून रयत वाढविली व फुलविली. रयत शिक्षण संस्थेची निर्मिती ही त्याग व सेवेतून झाली. आण्णांचा मृत्यूनंतर रयत पोरकी झाली. त्यावेळी कर्मवीरांचे सुपुत्र आप्पासाहेब भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या संघटकपदी निवड करण्यात आली. आप्पासाहेब म्हणजे सृजनशील, नितीमान असे व्यक्तिमत्त्व..!  आप्पासाहेबांचा स्वभाव सहिष्णू आणि सहनशील होता. कर्मवीरांप्रमाणेच त्यांनीही... आणखी वाचा
प्रशांत लाड
Ranking Final
मागील 15-20 वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले. या बदलाचे अनेक सकारात्मक व नकारात्मक परिणाम समाज जीवनावर झाले. जगात क्रांती घडवायची असेल तर शिक्षणासारखे दुसरे प्रभावी अस्त्र नाही. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची सुंदर व्याख्या आपल्याला सांगितली. शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यामुळे चारित्र्य घडते, मन:शक्ति वाढते, बुद्धिमता धारधार होते आणि या सर्वांमुळे माणूस स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. तो परिपूर्ण माणूस... आणखी वाचा
विजय वेदपाठक
special story on corona effect on mind
लॉकडाउन मे महिनाअखेरपर्यंत वाढले आहे. होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कोरोना, कोविड १९ असे शब्द गेल्या काही दिवसांत आपल्या परिसरात अधिक चर्चेत आले आहेत. त्यातच सोशल मीडियावरून फिरणाऱ्या पोस्टची भर पडत आहे. वातावरणातील मळभ अजून काही दूर झालेले नाही. त्यामुळेच कधी एकदाचा हा कोरोना मरतोय, अशी भावना जनमानसात झाली आहे.  हीच भावना एकटे असताना विचार करताना सातत्याने मनात घुमत... आणखी वाचा
देवीदास तुळजापूरकर, औरंगाबाद
photo
अखेर अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत निर्माण झालेले संकट दुर करता यावे यासाठी बहुप्रतिक्षित आर्थिक प्रोत्साहन योजना एक एक करत १४ मे ते १७ मे सलग चार दिवस पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या. अर्थातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १३ मे रोजी राष्ट्राला उद्देशुन केलेल्या वीस लाख कोटी रुपयांच्या मदतीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवरच ज्याच मोल आर्थिक परिभाषेत सकल घरेलु उत्पादनाच्या १०... आणखी वाचा
प्रा. गजानन वाघ, वाशीम
Prof Gajanan Wagh's story on lockdown
"अहो, दुसरं काही नाही आणलं तरी भागते. पण झाडू आणा लागते आठवणीनं. झिजू झिजू किती खराब झाला. आता नवाच लागते.." वाशीमला माल घेऊन जाणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे सुवर्णाने अशी मागणी नोंदवली, तेव्हा सुभाषने आधी मानेने कबुली जवाब दिला. नंतर तो म्हणाला, "बाई, लाॅकडाऊन आहे! दुकानं उघडी लागतील का नाही? भेटला तं आणतो!" बायकोने मागून मागून काय मागितलं तर झाडू! झाडू हे खरं तर लक्ष्मीचं रुप. गृहलक्ष्मीनं स्वतःसाठी काही न मागता... आणखी वाचा
डॉ.अनिमिष चव्हाण,एम. डी. (मनोविकारतज्ञ), सातारा.
Article Of Doctor Animish Chavan
जगात सर्वत्र घडणाऱ्या अपघात, हिंसा, आत्महत्या वगैरे घटनांचा करोना-संकटाच्या पार्श्वभूमीवर विचार करत आहोत. पण, खरोखर करोना-संकट हेच या घटनांचं कारण आहे का? की हा केवळ रंगमंचातील बदल आहे? हे आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर करोनाची पार्श्वभूमी आपल्याला या घटनांचा सुस्पष्ट विचार करण्यासाठी एक संधी आहे, असं म्हणता येईल. कारण, या सर्व घटनांमागचे मूलभूत कारण हे बिफोर कोरोना, ड्युरिंग कोरोना आणि आफ्टकोरोना आश्‍... आणखी वाचा
रवींद्र मंगावे
Karnataka will be the first state to start the economic cycle after the Corona crisis
कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात हाहाकार माजवला आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांबरोबर विविध राज्यांनीही हे संकट परतवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. कर्नाटकात कोविड -19 रुग्णांची संख्या सुरवातीपासूनच नियंत्रणात आहे. तबलिगी मरकज कनेक्‍शनमुळे कर्नाटकात त्याचा प्रसार झाला असला तरी राज्य सरकारने त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. कोरोना नियंत्रण व व्यवस्थेबाबत टाइम्स नाऊ आणि ओरोमॅक्‍स यांनी संयुक्तपणे केलेल्या... आणखी वाचा
महेश गावडे
 learn to deal with adversity
आत्महत्या ही एक ज्वलंत सामाजिक समस्या आहे. आत्महत्येमागे विविध बाबी कारणे असू शकतात. खरे तर आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे आणि कायद्यानेही गुन्हा आहे; मात्र तरीही हे टोकाचे पाऊल उचलले जाते. अशा कृत्याने कुटुंब उद्‌ध्वस्त होऊ शकते. कोरोनामुळे देशावर मोठे संकट कोसळले. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत... अनेकांचे आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यही धोक्‍यात आले आहे. याचे दूरगामी परिणाम सर्व क्षेत्रांवर... आणखी वाचा
सुमेधा मेटकर (sumedhametkar38@gmail.com)
"मी" मी एक मनुष्य  नाकर्ता....  उभारलेले विश्व्                                                        कुचकामी....  मांडलेली मते  पोकळ....  बघितलेले स्वप्न  बेभरवशी.... साकारलेले भविष्य....  कलंकित....  आजचा दिवस....  महाग... आणखी वाचा
डॉ. शिवानंद भानुसे, औरंगाबाद
Article by Shivanand Bhanuse on Chhatrapati Sambhaji Raje
छत्रपती संभाजीराजे,इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेले नाव. तेजस्वी मुद्रा,आणि तितकेच तेजस्वी प्रखर कार्यकर्तुत्व.... स्वच्छ सुंदर नितीमत्तेने भरलेली जीवनशैली. निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न. शिवछत्रपतींच्या परिवारातील सर्वार्थाने पराक्रमी पुरुष म्हणून संभाजी राजांना इतिहासाने गौरवले आहे.स्वराज्याचा वारसा खऱ्या अर्थाने सांगणारा पुरुषार्थ संभाजीराजे मध्ये होता.मुघली सत्तेला शह देणारा एक मुत्सद्दी... आणखी वाचा
अमोल कविटकर
amol-pic.jpg
'कोरोना आणला पासपोर्ट वाल्यांनी भोगताहेत रेशन कार्डवाले' कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात झाली त्यावेळी सहज फिरलेला हा सोशल मीडियावरील मॅसेज इतका खरा ठरेल असं कदाचित कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण हे खरं आहे. नरकयातना हा शब्द लाजेल इतकी भयाण परिस्थिती मोल-मजुरी करणाऱ्या वर्गाची आहे. संघटीत नसल्याने 'आवाज' नाही आणि आवाज नसल्याने दखल नाही. येईल त्या परिस्थितीशी दोन हात करत हा वर्ग कमालीचा संघर्ष करतोय. कोरोनापेक्षा... आणखी वाचा
सु. य. कुलकर्णी, औरंगाबाद
photo
नुकताच म्हणजे २९ एप्रिल हा नृत्यदिन साजरा झाला. या निमित्ताने जगभरात नृत्य-कलेचे सादरीकरण केले जाते. भारतात कश्‍यक, ओडिसी, भरतनाट्यम, मणिपुरी, कुचिपुडी अशा शास्त्रीय नृत्यकला प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. या कलेचा पाया खोलवर मुळापर्यंत रुजलेला आहे. या कलेचे व्यापक ज्ञान एका पिढीकडून पुढील पिढीपर्यंत पोहाचवण्याचे काम नृत्य कलाकारांनी अविरत खंड पडू न देता सेवेभावे केलेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज नृत्यकला... आणखी वाचा