

Budh Margi After Diwali 2026: Lucky Zodiac Signs & Wealth
esakal
Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानले जाते. बुध हा ग्रह व्यापार, वाणी, शिक्षण, गणित, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि संवाद कौशल्याचा कारक मानला जातो. त्यामुळे बुधाच्या चालित किंवा स्थितीत होणाऱ्या बदलाचा थेट प्रभाव संपूर्ण देशासह सर्व १२ राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर पडत असतो.
पंचांगानुसार, सध्या तुळ राशीत वक्री अवस्थेत असलेला बुध ग्रह आगामी १३ नोव्हेंबर २०२६ ला रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी तुळ राशीतच सरळ चाल म्हणजेच मार्गी होणार आहे. जवळपास २१ दिवस वक्री राहिल्यानंतर बुध मार्गी होणार असल्याने काही विशिष्ट राशींच्या नशिबात मोठा पालट पाहायला मिळणार आहे. चंद्र राशीवर आधारित या ग्रह बदलाचा कोणत्या ३ राशींच्या व्यक्तींना बक्कळ फायदा होणार आहे, ते सविस्तर पाहूया.