Ketu Transit 2026
esakal
ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू या छाया ग्रहांच्या गोचराला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असल्याचं मानलं जातं. आता लवकरच केतू आपली रास बदलणार आहेत. ५ डिसेंबर २०२६ रोजी केतू वक्री गतीने सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, २०२७ मध्ये केतूचं पुन्हा राशी परिवर्तन होणार नाही. त्यामुळे पुढील १८ महिने केतू कर्क राशीतच राहतील. या काळात काही राशींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. या गोचरामुळे तीन राशींसाठी चांगला काळ सुरू होऊ शकतो.