Saturn Transit 2026
esakal
ज्योतिषशास्त्रात शनीच्या हालचालीला विशेष महत्त्व दिलं जातं. शनीला कर्मफळदाता मानलं जातं. त्यामुळे शनीच्या राशी परिवर्तनासह त्याच्या चालीतील बदलाचाही सर्व राशींवर परिणाम होत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. सध्या वक्री अवस्थेत असलेला शनी लवकरच मार्गी होणार आहे. म्हणजेच शनीची उलटी चाल थांबून तो पुन्हा सरळ दिशेने मार्गक्रमण करेल. येत्या ११ डिसेंबर २०२६ पासून शनी मार्गी होणार असून, ही स्थिती सुमारे २४१ दिवस कायम राहणार असल्याचं पंचांगानुसार सांगितलं जात आहे.