Pitru Paksha 2022 | भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का..? जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pitru Paksha 2022

Pitru Paksha 2022 | भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का..? जाणून घ्या कारण

भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत पितृपक्ष साजरा केला जातो. या काळात घरातील पितरांचे स्मरण केले जाते. यासह पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी मोठ्याप्रमाणावर श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जातात. पितरांच्या स्मरणाचा हा पितृपक्ष नेमका भाद्रपद महिन्यातच का येतो? असा प्रश्न आपल्याला पडतो. याचे उत्तर आपण ज्योतिष अभ्यासकांकडून जाणून घेवूया.

हेही वाचा: Pitru Paksha 2022 | पितृपक्षात नविन वस्तूंची खरेदी करावी का? धर्म अभ्यासक सांगतात

पितृपक्षात पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी तथा पितरांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्षात श्राद्धादी कर्म केले जातात. भाद्रपद कृष्ण पक्षातच पितृपक्ष का साजरा केला जातो यावर ज्यातिष अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, पितृपक्ष साजरे करण्यामागे भारतीय कालगणना, वैदीक गणित आहे. पितरांची मुख्य देवता यम आहे. या देवतेच जे लोक आहे त्याला यम लोक असे म्हणतात. हा यमलोक अंतरिक्षामध्ये आहे. यालाचा पितृलोक असेही म्हणतात. पितृलोकाचा अधिपती हा यम आहे.

हेही वाचा: Pitru Paksh: पितृपक्षात देवतांची पूजा योग्य की अयोग्य? शास्त्र जाणून घ्या

वैदीक गणिताप्रमाणे अंतरिक्षामध्ये ग्रहांच परिवलन होत असतं, त्यावेळी रवि (सुर्य) विशाखा नक्षत्रात जातो. वैदीक गणितानुसार यावेळेस केलेले कार्य हे पितृलोकाशी संबंधीत असतात. या काळात पितृ जागृत रुपाने वायु अवस्थेत पृथ्वीवर अवतरतात त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान म्हणून आपण जे श्राद्धादी पितृकर्म करतो हे त्यांना त्वरीत प्राप्त होते. त्यामुळे विशाखा नक्षत्र असताना पितृपक्ष असतो. आणि याकाळात पितरांसाठी श्राद्धादी कर्म जसे कि तर्पण, पिंडदान केले जाते.

हेही वाचा: Pitru Paksha 2022: पितृपक्षात या 5 पदार्थांमुळे लागू शकतो पितृदोष

Web Title: Why Pitrupaksha 2022 In The Month Of Bhadrapada Scientific Reason

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :culturePitru Paksha