

Balrampur Car Accident Near Durga Temple
esakal
Balrampur Car Accident Near Durga Temple : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसून व्हिडिओ पाहणाऱ्या ग्रामस्थांच्या समूहाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चारनागाहिया-बेल्हा गावात दुर्गा मंदिरासमोर हा अपघात झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी बहराइच येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.