पंकजाताईंना दुसऱ्यांदा कोरोना! धनंजय मुंडेंचा सल्ला, म्हणतात, 'ताईने...'

dhananjay munde and pankaja munde
dhananjay munde and pankaja mundedhananjay munde and pankaja munde

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याविषयी मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडेंना आस्थेवाईकपणे काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, की "मी पंकजा ताईला फोन तर करू शकलो नाही, मात्र मॅसेजद्वारे सांगितलंय की, दुसऱ्यांदा कोरोना झालाय, त्यामुळं पोस्ट कोविडची काळजी फार महत्वाची आहे. त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे. आस्थेवाईकपणे चौकशी करत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

dhananjay munde and pankaja munde
पेगाससची तुमच्यावरही पाळत? तसं वाटत असल्यास कळवा: सुप्रीम कोर्टाची समिती

याबाबतची माहिती त्यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. दरम्यान अद्याप कोरोना संपलेला नसून नागरिकांनी जरुरी असेल तरच घराच्या बाहेर पडावे, अन्यथा घरातच राहावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन धनंजय मुंडें यांनी परळीत मीडियाशी बोलतांना, बीड जिल्हा वासीयांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com