पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

Delhi Taxi Associations Announce August 4 Parliament March Against E20 Fuel Policy : दिल्लीतील टॅक्सी संघटनांनी E20 इंधन धोरण, वेगमर्यादा आणि स्क्रॅपेज धोरणाविरोधात 4 ऑगस्ट रोजी संसद मार्चची घोषणा केली.
E20

E20

esakal

Updated on

देशात 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) वापराच्या धोरणाविरोधात आता टॅक्सी चालक आणि वाहतूक व्यावसायिकांनी मोठे आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. जंतर-मंतर येथे 36 दिवस चाललेल्या विद्यार्थी आणि GenZ आंदोलनानंतर आता E20 इंधनाच्या वापराबाबत वाढत्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात होत असून, दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसद मार्च करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात ऑल इंडिया टुरिस्ट परमिट (AITP) असलेल्या टॅक्सी चालक आणि ट्रान्सपोर्टर्सचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com