

A 15-year-old girl was allegedly sexually assaulted at a hotel in Aligarh after being lured there by a man she met through Facebook.
अलीगड : फेसबुकवर झालेली ओळख एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली. सोशल मीडियावरून मैत्री झालेल्या तरुणाने मुलीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर हॉटेलच्या संचालकानेही तिला खोलीत डांबून ठेवत धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून संबंधित हॉटेलही बंद करण्यात आले आहे.