

Japan and US Cyber Security Warning Raises Fears of Global Website Hacking and Unauthorized Access to Computer Systems Worldwide
sakal
टोकियो : जगभरातील संकेतस्थळांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ‘पीएचपी’ या प्रोग्रॅमिंग भाषेतील दोन गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटींचा गैरफायदा घेऊन हॅकर्सना संकेतस्थळांच्या यंत्रणांमध्ये दूरस्थपणे घुसखोरी करता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपानच्या पंतप्रधान सानाए तकाइची यांनी सर्व संबंधित संस्थांना तातडीने सुरक्षेची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए) आणि तपास संस्था ‘एफबीआय’ यांनीही या संदर्भात इशारा दिला आहे.