Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav pays tribute to police personnel who died in the line of duty during a Police Commemoration Day event in Bhopal.
esakal
कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या मध्य प्रदेश पोलीस दलातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आदरांजली वाहिली. २१ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर आयोजित राज्यस्तरीय पोलीस स्मृती दिन परेड सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीपैकी ५० टक्के रक्कम त्यांच्या पत्नीला आणि उर्वरित ५० टक्के रक्कम आई-वडिलांना देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.