

Sharad Pawar addresses media, denies any discussion regarding Baramati election.
नवी दिल्ली : ‘‘बारामतीच्या निवडणुकीबाबत कोणीही माझ्याशी बोललेले नाही आणि मीही कुणाशी बोललेलो नाही,’’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. बारामतीमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करणे, ही अन्य विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, असे सूचक विधान त्यांनी केले. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या वाटाघाटी सुरू होत्या. ही चर्चा आता थांबली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.