

Schools in Jharkhand’s Palamu district are set for modernisation, with CBSE curriculum planned at Dali and Madan from 2027.
esakal
एकेकाळी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या झारखंडमधील पलामू जिल्ह्यात आता शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छतरपूर तालुक्यातील डाली आणि पांकी तालुक्यातील माडन या नक्षलग्रस्त भागांतील हायस्कूलचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने पलामू जिल्ह्यातील आणखी चार शाळांचा ‘सीएम स्कूल ऑफ एक्सलन्स’ योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डाली आणि माडनसह हरीहरगंज आणि विश्रामपूर येथील शाळांचा समावेश आहे. या दोन शाळांमध्ये २०२७ पासून सीबीएसई अभ्यासक्रमानुसार शिक्षण सुरू करण्याचे नियोजन आहे.