स्वाती केतकर-पंडित
मी swati ketkar Pandit सध्या सकाळमध्ये मल्टीमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे.
'सकाळ प्लस' मध्ये मी दीर्घलेख (long-form content) निर्मितीवर विशेष भर देते. स्थानिक घडामोडींपासून जागतिक राजकारणापर्यंत, ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांपासून ते ग्रामीण भारतातील वास्तवापर्यंत—विविध स्तरांवर प्रभाव टाकणाऱ्या विषयांवर माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन करायला मला आवडतं.
पत्रकारितेतील १५ वर्षांचा अनुभव गाठीशी असून, मी ‘लोकसत्ता’, ‘लोकप्रभा’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ अशा आघाडीच्या माध्यमांतून काम केलं आहे. दैनंदिन बातम्या, करिअर मार्गदर्शन, नातेसंबंध, गुन्हेगारी विश्लेषण, जीवनशैली आणि मनोरंजन या विषयांवर विपुल लिखाण केलं आहे.
सकाळमध्ये येण्याआधी लोकप्रभा, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि मुंबई आकाशवाणी रेडिओ जॉकी अर्थात आरजे यासारख्या अनेकविध माध्यमांचा अनुभव गाठीशी आहे.
या पंधरा वर्षांच्या काळात माधुरी दिक्षीतपासून ते लष्करातील मेजरपर्यंत अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.