उदयपूरच्या घटनेला सर्वस्वी नुपूर शर्मा जबाबदार; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!

सत्ता नुपूर शर्माच्या डोक्यात गेलीये, अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं आहे.
Nupur Sharma News
Nupur Sharma Newsesakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माच्या विधानावरुन तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. (Prophet Row)

Nupur Sharma News
उदयपूरमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची दुकानात घुसून हत्या; दोघांना अटक

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या मागे घेतल्या. पण माघार घेण्यासाठी एक दिवस उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयाने तिच्या तक्रारीवर एका व्यक्तीला अटक केली आहे, परंतु अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. (Nupur Sharma News)

Nupur Sharma News
प्रेषित मोहम्मद-नुपूर शर्मा वाद चिघळला; अल-कायदापाठोपाठ IS ची थेट भारताला धमकी

सर्वोच्च न्यायालयाने तिच्या हट्टीपणाबद्दल आणि अहंकाराबद्दल टीका केली. ती एका पक्षाची प्रवक्ता आहे, तिच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. देशातलं तापलेलं वातावरण पाहता नुपूर शर्माने (Nupur Sharma) आता देशाची माफी मागावी, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com