उदयपूरमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची दुकानात घुसून हत्या; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदयपूरमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची दुकानात घुसून हत्या; दोघांना अटक

उदयपूरमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची दुकानात घुसून हत्या; दोघांना अटक

उदयपूर : राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. मृत कन्हैया लाल हा टेलरिंगचे दुकान चालवायचा. कपडे शिवण्याच्या बहाण्याने मारेकरी त्याच्या दुकानात आले आणि त्यांची हत्या करण्यात आलल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर हत्या करणाऱ्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरलही केला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (Youth Murder In Udaipur )

या घटनेनंतर उदयपूरमध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले असून, घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी दुकाने बंद ठेवली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. शहर आणि परिसरात अफवा पसरू नये यासाठी उदयपूर जिल्ह्यात इंटरनेट सेवा पुढील 24 तासांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: "श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदाराची स्वतःविरोधातच पोस्ट

आरोपींना शिक्षा होईल - सीएम गेहलोत
मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, उदयपूरमधील घडलेल्या हत्येचा निषेध असून, या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि पोलीस या घटनेचा पूर्ण तपास करण्यात येईल असे आश्वासन गेहलोत यांनी दिले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता राखण्याचे आवाहन गेहलोत यांनी केले आहे. याशिवाय सीएम गेहलोत यांनी जनतेला हत्येचा व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहनही केले आहे.

हेही वाचा: ...याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात
दरम्यान, घटनेनंतर उदपूरमध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे उदयपूरचे एसपी मनोज कुमार यांनी सांगितले. गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल. काही आरोपींची ओळख पटली आहे, आम्ही टीम पाठवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओही आम्ही पाहिला आहे.

Web Title: Hindu Shopkeeper Beheaded In Udaipur Over Social Media Post On Nupur Sharma

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top