

Supreme Court of India delivers an important observation in a dowry harassment case while upholding the acquittal of the husband and his relatives due to insufficient evidence
esakal
हुंडा देण्याची आर्थिक क्षमता नसणे, हा हुंड्याच्या मागणीवरून विवाहितेचा छळ झाल्याचे आरोप फेटाळण्यासाठी पुरेसा आधार ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. मात्र, अशा आरोपांची सत्यता तपासताना संबंधित महिलेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती विचारात घेणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. हुंडाबळीच्या एका प्रकरणात पती आणि त्याच्या नातेवाइकांची निर्दोष मुक्तता कायम ठेवताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.